ads

आता पाच लाखापर्यंत उपचार मिळणार मोफत!

आता पाच लाखापर्यंत उपचार मिळणार मोफत!

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना


एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना 2024:-


नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले योजना व केंद्र सरकारची आयुष्यमान योजना या ही योजना सुधारित पाच लाखापर्यंत याचा लाभ मिळणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महात्मा फुले जणआरोग्य योजना थोडक्यात: महाराष्ट्र शासनाचे महत्त्वकांक्षी योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आत्ता  पाच लाखापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना 2012 पासून राबविण्यात येते.

 या योजनेला आधी जीवनदायी योजना नंतर राजीव गांधी योजना आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आणि पुढे 2018 पासून एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या नावाने ओळखले जात आहे.

आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत. 

आधी पिवळी व केसरी शिधापत्रिका धारकांना ही योजना लागू होती. आता पांढऱ्या व रेशन कार्ड नसलेल्या लोकांना सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे:-

1.रेशन कार्ड ( पिवळे केसरी अंतोदय अन्नपूर्णा पांढरे सर्व)
2. एक वैध ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी)
3. रेशन कार्ड नसेल तर तहसीलदार प्रमाणपत्र.
4. आयुष्यमान कार्ड

योजनेसाठी पात्र लाभार्थी:-
1. महाराष्ट्रातील सर्व पिवळे, केसरी ,पांढरे सर्व सिद्धपत्रिका धारक.
2. रेशन कार्ड नसेल तरी सुद्धा पात्र.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ:-

1. या योजनेअंतर्गत वरील सर्व पात्रता धारक लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

2. या योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजना शासन निर्णय: इथे पहा
 
अधिकृत वेबसाईट:https://www.jeevandayee.gov.in
महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर :-155388
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads