प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना 2025| PM-VBRY Scheme 2025|
![]() |
PM-VBRY |
नमस्कार मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९व्या स्वतंत्र दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून "प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना"(PM-VBRY) याची घोषणा केली आहे. ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. जवळपास एक लाख कोटी रुपयांची योजना आहे.
या योजनेचे महत्त्वाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे तसेच तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास ३.५ कोटी पेक्षा जास्त रोजगार तयार होणार आहेत. यामध्ये १ कोटी ९२ हजार हे रोजगार पहिला नोकरी करणाऱयांसाठी राहतील.
या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे एक भाग म्हणून योजना सुरू केलेले आहे. पूर्वी या योजनेचे नाव " एम्प्लॉयमेंट लिन्क्ड इन्सेंटिव्ह(ELI)" असे होते. आता "प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना"(PM-VBRY) २०२५ ओळखली जाणार आहे. बजेट जवळपास 99 हजार 446 कोटी रुपये इतके आहे हे बजेट रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास साठी वापरले जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:-
लाभ:- खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी सुरू करणारे 18 ते 35 वय वर्ष वयोगटातील तरुणांना पंधरा हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.
वितरण:- दोन हप्ते मध्ये ही रक्कम दिली जाणार आहे.
पहिला हप्ता:- जवळपास सहा महिने नोकरी पूर्ण केल्यावर सात हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत.
दुसरा हफ्ता:-
12 महिने नोकरी केल्यानंतर तसेच आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर 7500 भेटणार आहे.
पात्रता :- यामध्ये ईपीएफ मध्ये नोंदणी केलेलं नोंदणीकृत कामगार आणि एक लाख रुपयांच्या आतील पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील.
नियुक्तदारांसाठी प्रोत्साहन योजना:-
ज्या कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे त्यांना परती कर्मचारी 3000 रुपये महिना इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे.
योजनेचा कालावधी:- सर्व क्षेत्रासाठी योजनेचा कालावधी हा दोन वर्षासाठी असणार आहे.
कंपन्यांसाठी अटी:
1) 50 पेक्षा कमी कर्मचारी= कंपन्यांना किमान २ वेळा नवीन भरती करता येईल.
2) 50 पेक्षा जास्त कर्मचारी= कंपन्यांना किमान ५ वेळा नवीन भरती करता येईल.
योजनेचे अंमलबजामचे स्वरूप थोडक्यात:
कार्यक्रम चालवणारी संस्था :- ही योजना "कर्मचारी भविष्य निधी संघटना"(EPFO)यांच्या अंतर्गत ही चालवली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन पोर्टलद्वारे याच्यावर अर्ज करता येत येणार आहेत सध्या चालू झालेले नाही आहे.पोर्टल चालू झाल्यावर तुम्हाला या वेबसाईट द्वारे कळविण्यात येईल.
निष्कर्ष:-
"प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना"(PM-VBRY) ही योजना केवळ रोजगाराची हमी नाहि तर तरुण भारताचे आर्थिक सक्षमीकरणाचे तसेच आर्थिक महासत्ता चे मुख्य प्रोसाहन आहे. या योजनेद्वारे आर्थिक साक्षरता कार्यक्रमाद्वारे दीर्घकालीन बचत तसेच नवनवीन उद्योग ते प्रोत्साहन देऊन यातून भारतात 2047 पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्यासाठी महत्त्वाचे अशी ही योजना मदत करेल.
"प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना"(PM-VBRY) ही योजना केवळ रोजगाराची हमी नाहि तर तरुण भारताचे आर्थिक सक्षमीकरणाचे तसेच आर्थिक महासत्ता चे मुख्य प्रोसाहन आहे. या योजनेद्वारे आर्थिक साक्षरता कार्यक्रमाद्वारे दीर्घकालीन बचत तसेच नवनवीन उद्योग ते प्रोत्साहन देऊन यातून भारतात 2047 पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्यासाठी महत्त्वाचे अशी ही योजना मदत करेल.
0 टिप्पण्या