ads

PM Kisan Samman Nidhi/PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी झाला आहे, असे तपासा खात्यात किती पैसे आले आहेत ते तपासा.

PM Kisan Samman Nidhi / PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी झाला आहे, असे तपासा खात्यात किती पैसे आले आहेत ते तपासा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी ( PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. याचा अर्थ आता हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासावे. आपण कोणत्या मार्गांनी तपासू शकता ते जाणून घ्या.

PM Kisan Samman Nidhi
PM Kisan Samman Nidhi


देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सन 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. आज PM मोदींनी झारखंड दौऱ्यात PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जाहिर केला आहे.

पीएम किसान:-

दिनांक १५ नोव्हेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथून १५ व्या हफ्त्याचे अनावरण केले आहे. आपण खालील दिलेल्या पद्धतीनुसार आपला हफ्ता जमा झाला कि नाही हे तपासू शकता. 

मोबाइल संदेश :-

तुमच्या खात्यावर पीएम किसान चे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला एक संदेश आला असेल.त्याद्वारे सुद्धा तुम्ही तपासू शकता कि तुमचा हफ्ता जमा झाला आहे कि नाही. 

पासबुक:

समजा काही कारणांनी तुमच्या मोबाईल वर संदेश नाही आला तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन स्टॅमेंट काढून तुम्ही तपासू शकता. किंवा तुमच्या पासबुक वर एन्ट्री मारून तुम्ही तपासू शकता. 

एटीएम:-

त्यानंतर तुमच्याकडे एटीम कार्ड असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा पीएम किसान चा हफ्ता आला आहे का नाही हे तपासू शकता. 

मिस्ड कॉल :-

तुम्ही बँकेला मिसकॉल देऊनही हा हफ्ता तपासू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads